अमेरिकेत हातोड्याचे 50 वार करत भारतीय विद्यार्थ्याची हत्या | पुढारी

अमेरिकेत हातोड्याचे 50 वार करत भारतीय विद्यार्थ्याची हत्या

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची डोक्यावर 50 वेळा हातोड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आली. विवेक सैनी (वय 25) असे मृत भारतीय विद्यार्थ्याचे नाव असून, त्याची हत्या एक बेघर झालेल्या व्यक्तीने केली आहे.

ज्युलिअन फॉकनर (वय 53) असे आरोपीचे नाव असून, तो बेघर झाला होता. विवेक एका फूट मार्टमध्ये नोकरी करत होता. स्टोअरमध्ये फॉकनर आला. विवेक आणि स्टोअरमधील कर्मचार्‍यांनी बेघर फॉकनरला राहण्यासाठी जागा दिली, पण त्याला विवेकने घर सोडण्यासाठी सांगितल्यानंतर संतप्त होऊन फॉकनरने हातोड्याने वार करत विवेकची हत्या केली. जॉर्जियाच्या पोलिसांनी फॉकनरला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विवेक त्याला जेवणही देत होता.

Back to top button