मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष गोत्‍यात, विरोधक ‘महाभियोग’ दाखल करण्‍याच्‍या तयारीत | पुढारी

मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष गोत्‍यात, विरोधक 'महाभियोग' दाखल करण्‍याच्‍या तयारीत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सत्ताधारी आणि विरोधी खासदारांच्‍या संसदेत झालेल्‍या धुमश्‍चक्रीमुळे मालदीव पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्‍या अडचणीत पुन्‍हा वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष, संसदेत बहुमत असलेल्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.( Opposition party readies to move impeachment motion against Maldives President Mohamed Muizzu)

एमडीपी आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींसह एकूण 34 सदस्यांनी राष्ट्राध्यक्षांच्‍या विराेधातील महाभियोगाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. ( Opposition party readies to move impeachment motion against Maldives President Mohamed Muizzu)

रविवारी मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धुमश्‍चक्री उडाली होती. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी संसदेत मतदानावेळी हा प्रकार घडला. या मतदानाला विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याने हा प्रकार घडला होता. दरम्यान, मालदीवच्या संसदेत झालेल्‍या गोंधळानंतर आज जच्या अधिवेशनापूर्वी संसदेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ( Opposition party readies to move impeachment motion against Maldives President Mohamed Muizzu)

हेही वाचा : 

 

Back to top button