काबूल : अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीकडून केव्हा कसला फतवा काढला जाईल याचा नेम नसतो. आता तालिबानने नवा फतवा जारी केला असून, त्यानुसार जर कोणताही पुरुष अथवा महिला गर्भनिरोधके खरेदी करताना सापडला किंवा सापडली, तर संबंधिताला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. (Kabul)
याविरोधात आम जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच या नव्या फतव्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक, गर्भनिरोधकांवर तालिबान राजवटीने यापूर्वीच बंदी घातली आहे. तरीही चोरट्या मागनि जर कोणी गर्भनिरोधकांची खरेदी करताना आढळल्यास संबंधिताला तुरुंगवारी करावी लागणार आहे. तालिबानकडून महिलांची गळचेपी सुरूच असून, मुलींना केवळ सहाव्या इयत्तेपर्यंतच शिक्षण घेण्याची मुभा अफगाणिस्तानमध्ये आहे. तेथे ब्युटी पार्लरवरही यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.