Indo-Pakistan conflicts: “गंभीर परिणाम होतील…” : हवाई हल्‍ल्‍यानंतर पाकिस्‍तानचा इराणला इशारा | पुढारी

Indo-Pakistan conflicts: "गंभीर परिणाम होतील..." : हवाई हल्‍ल्‍यानंतर पाकिस्‍तानचा इराणला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बलुचिस्तानमध्ये इराणने हवाई हल्‍ला केल्‍याने पाकिस्‍तानमध्‍ये खळबळ माजली आहे. आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणे अस्वीकार्य आहे. या कृतीचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्‍तानने इराणला दिला असल्‍याचे वृत्त ‘अल जजीरा’ने दिले आहे. ( Indo-Pakistan conflicts )

इराणने बलुचिस्तानमध्‍ये केले हवाई हल्‍ले

इराणने आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये पाकिस्‍तानमध्‍ये सुमारे 50 किलोमीटर आत घुसून बलुच दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या तळांवर हवाई हल्‍ला केला. बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातील एक मशीदही त्यांनी उद्ध्वस्त केली. . इराणने केलेल्‍या क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍यात दोन जण ठार झाले आहेत. ( Indo-Pakistan conflicts )

एकतर्फी कारवाई हे चांगल्या शेजाऱ्याचे लक्षण नाही

हवाई हल्‍ल्‍यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पाकिस्तानच्या हल्ल्यात दोन निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तीन मुली जखमी झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन अस्वीकार्य आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. दहशतवाद हा सर्व देशांसाठी समान धोका आहे. त्यासाठी एकत्रितपणे कारवाई करता येईल. एकतर्फी कारवाई हे चांगल्या शेजाऱ्याचे लक्षण नाही. ही कृती द्विपक्षीय विश्वासाला तडा देते, असेही पाकिस्‍ताने म्‍हटले आहे.

Indo-Pakistan conflicts :  इराणने ‘जैश अल-अदल’च्‍या तळांना का लक्ष्‍य केले?

पाकिस्‍तानमधील बलुचिस्तानमध्ये जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेची स्थापना २०१२ मध्ये झाली. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे. जैश अल-अदलने गेल्या काही वर्षांत इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये, जैश अल-अदलने सिस्तान-बलुचेस्तानमधील पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्‍ल्‍यात इराणचे ११ पोलिस ठार झाले.

उत्तर इराकी शहर एरबिलवरही इराकने केले होते हवाई हल्‍ले

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने उत्तर इराकी शहर एरबिलजवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. सीरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवरही गार्ड्सने कारवाई केली होती. दहशतवादी गट ‘इस्‍लामिक स्‍टेट’ च्या बैठका उद्ध्वस्त करण्यासाठी इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही वापर केला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एरबिलमधील अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट

इराकमधील एरबिल शहरातील यूएस कॉन्सुलेटजवळही अनेक स्फोट झाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बॉम्बस्फोट अत्यंत हिंसक होता, त्यात अमेरिकन वाणिज्य दूतावास जवळील आठ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. इराकने एरबिल विमानतळाजवळ तीन ड्रोन देखील पाडले. प्रवाशांना अरिबल विमानतळावरच थांबवण्यात आले हाेते.

हेही वाचा : 

 

Back to top button