पुतीन यांचा विरोधक नेव्हलनी यांना पुन्हा जेलमध्ये डांबले | पुढारी

पुतीन यांचा विरोधक नेव्हलनी यांना पुन्हा जेलमध्ये डांबले

मॉस्को, वृत्तसंस्था : रशियाच्या जेलमधून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा कट्टर विरोधक असलेल्या लेक्सी नेव्हलनी यांना 20 दिवसांनी शोधून काढले आहे. आता ते आर्कटिक सर्कलच्या उत्तरेतील एक जेलमध्ये बंद असून, हे जेल सर्वात कठोर मानले जाते. खतरनाक गुन्हेगारांनाच या जेलमध्ये डांबले जाते.

‘पोलर वुल्प’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या जेलमधील तापमान पुढील आठवड्यात उणे 28 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. हे जेल रशियाच्या उत्तर-पूर्व खार्पमध्ये स्थित असून, मॉस्कोपासून सुमारे 1 हजार 900 किलोमीटरवर आहे. नेव्हलनी यांचा प्रवक्ता किरा यारमिश यांच्या माहितीनुसार, नेव्हलनी यांची आता तुरुंगात खूपच वाईट अवस्था होणार आहे. नेव्हलनी यांचे जीवन आणि जगणे आणखीनच बिकट होणार आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्‍या रशियन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेव्हलनी यांना रशियन अधिकार्‍यांना दूर ठेवायचे आहे.

Back to top button