GCSE Maths Exam | भारतीय वंशाच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची कमाल; १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठीची ‘जीसीएसई’ गणित परीक्षा उत्तीर्ण!

GCSE Maths Exam | भारतीय वंशाच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची कमाल; १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठीची ‘जीसीएसई’ गणित परीक्षा उत्तीर्ण!
-
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्‍था : लंडनमध्ये राहणाऱ्या एका सात वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाने शिक्षण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. जिव्‍यान रेड्डी ध्रुव या चिमुरड्याने ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण मानली जाणारी 'जीसीएसई' ही माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सामान्यतः १६ वर्षे वयाचे विद्यार्थी देत असलेल्या या गणिताच्या परीक्षेत जिब्यानने २४० पैकी १९६ गुण मिळवत 'ग्रेड ८' प्राप्त केली.

घरूनच घेतले शिक्षण

जिव्‍यानचे आई-वडील ध्रुव कुमार रेड्डी कट्टा आणि ऐश्वर्या देवी ध्रुव हे मूळचे भारताच्या आंध्र प्रदेशातील आहेत. सध्या ते पश्चिम लंडनच्या 'साऊथ रायस्लिप' भागात राहतात. जिब्यानची गणितातील विलक्षण बुद्धिमत्ता, कठीण समीकरणे सोडवण्याची वेगवान पद्धत पाहून पालकांनी त्याला फेब्रुवारी २०२६ मध्ये मुख्य प्रवाहातील प्राथमिक शाळेतून काढून घरीच शिकवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो त्याच्या आवडीनुसार अभ्यास करू शकेल.

जिव्‍यान आता 'ए लेव्हल' गणित आणि पुढील उच्च गणिताच्या अभ्यासाची तयारी करत आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक बनून संपूर्ण जगाला परवडणारी 'रोबोटिक्स' तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news