आठ लाखांचे महागडे बूट केले दान | पुढारी

आठ लाखांचे महागडे बूट केले दान

वाशिंग्टन, वृत्तसंस्था : कोणत्याही ठिकाणी असलेल्या दानपेटीतून नोटा, किमती वस्तू आणि सोने मिळण्याची अपेक्षा असते. पण, अमेरिकेतील एका दानपेटीत चक्क बुटाची जोडी दान केली आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसेल; पण हे बूट साधे नाहीत, तर अतिशय महागडे आहेत. ओरिगॉनमध्ये एका अनाथालयात एका व्यक्तीने बॉक्समधून बूट दान केले आहे. एअर जॉर्डन-3 नावाचे (स्टड) हे बूट एखाद्या भिंत, डोंगरावर चढण्या आणि उतरण्यासाठी वापरले जातात.

जगप्रसिद्ध टिंकर हॅटफिल्ड कंपनीने हे बूट डिझाईन केले आहेत. याचा वापर सेलिब्रिटींकडून विशेषतः एखाद्या पुरस्कार सोहळ्यासाठीही केला जातो. या बुटाची किंमत दहा हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे 8 लाख 34 हजार 100 इतकी होते. दानपेटीत इतके महागडे बूट पाहून अनाथालयाच्या ट्रस्टींना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मात्र या बुटाच्या जोडीचा लिलाव करण्यात आला आणि एकाने ही जोडी सुमारे 20 हजार डॉलर म्हणजे 16 लाख 67 हजार रुपयांना खरेदी केली.

Back to top button