ड्रॅगनचा लडाखवर दावा

ड्रॅगनचा लडाखवर दावा

बीजिंग, वृत्तसंस्था : काश्मीरमधील कलम 370 कायमस्वरूपी रद्द करण्याच्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. लडाख हा आमचा भाग आहे. न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाने आम्हाला तसा काही फरकही पडत नाही. जे आमचे आहे, ते आमचे आहे. लडाखला भारताचा एक प्रदेश म्हणून आमची मान्यता नव्हती व नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे सीमेचा पश्चिम भाग चीनच्या मालकीचा आहे, हे सत्य बदलणार नाही, असे तारेही निंग यांनी तोडले आहेत.

'370 रद्द'लाही होता चीन-पाकचा विरोध

भारत सरकारने काश्मीरबाबतचे कलम 370 रद्द केले तेव्हाही चीन आणि पाकिस्तानने थयथयाट केला होता. संयुक्त राष्ट्रांतील ठरावानुसार काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा, असा सल्ला न मागता या दोन्ही देशांनी भारताला उद्देशून दिला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news