israel hamas war: इस्रायल-हमासमध्ये चार दिवसांची युद्धबंदी : १३ इस्रायली महिला, लहान मुलांची सुटका होणार | पुढारी

israel hamas war: इस्रायल-हमासमध्ये चार दिवसांची युद्धबंदी : १३ इस्रायली महिला, लहान मुलांची सुटका होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल – हमासच्या ७ आठवड्यांच्या युद्धात कतारने केलेली मध्यस्थी यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून चार दिवसांची युद्धबंदी लागू झाली आहे. आज (दि.२४) उशिरा १३ इस्रायली महिला आणि लहान मुलांची सुटका करण्यात येणार आहे. तर ५० जणांना पुढील ४ दिवसांत सोडण्यात येणार आहे. israel hamas war

इस्रायल-हमास युद्धात चार दिवसांची युद्धबंदी लागू झाल्यानंतर आज उशिरा ओलिसांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे, असे कतारने सांगितले आहे. israel hamas war

युद्धादरम्यान ओलिस ठेवलेल्या १३ इस्रायली महिला आणि मुलांचा पहिला गट आज सोडण्यात येणार आहे. या वृत्ताचे जगभरातून स्वागत होत आहे. पण, जवळपास सात आठवडे सुरू असलेल्या या भीषण युद्धानंतर युद्ध अधिक तीव्र होत गेले आहे.

गाझामध्ये मानवतावादी मदत पुन्हा सुरू होईल

युद्धविराम तात्पुरता असेल, जो नंतर पुन्हा सुरू होईल. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आज सकाळी 7 वाजता युद्धविराम सुरू होईल आणि त्यात उत्तर आणि दक्षिण गाझामधील युद्धविरामाचाही समावेश असेल. यामुळे अत्यावश्यक आणि मानवतावादी मदत गाझापर्यंत पोहोचू शकेल. यासह, वृद्ध महिलांसह पहिल्या ओलीसांची दुपारी 4 वाजता सुटका केली जाईल.

israel hamas war युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची संधी

मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अन्सारी यांनी कतारची राजधानी दोहा येथे सांगितले की, 50 इस्रायली ओलीस सोडले जातील. पॅलेस्टिनींना इस्रायली तुरुंगातून मुक्त केले जाईल आणि या युद्धविरामामुळे युद्ध कायमचे थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा 

Back to top button