World Hindu Congress 2023 | “जग हे एक कुटुंब, आम्ही सर्वांना ‘आर्य’ बनवू : मोहन भागवत | पुढारी

World Hindu Congress 2023 | "जग हे एक कुटुंब, आम्ही सर्वांना 'आर्य' बनवू : मोहन भागवत

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थायलंडमधील बँकॉक येथे ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२३’ मध्ये संबोधित केले. त्यांनी म्हटले की, “जग हे एक कुटुंब आहे आणि आम्ही प्रत्येकाला ‘आर्य’ बनवू जी संस्कृती आहे… भौतिक सुखाच्या सर्व साधनांचा ताबा मिळवण्यासाठी लोक एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आम्ही अनुभवले आहे…” (World Hindu Congress 2023)

संबंधित बातम्या 

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आजचे जग आता अडखळत आहे. २ हजार वर्षांपासून त्यांनी आनंद, शाश्वत सूख आणि शांती आणण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचा प्रयत्न केला आहे. त्यांनी विविध धर्म आजमावले. त्यांनी भौतिक समृद्धी गृहीत धरली. पण समाधान मिळाले नाही. आता विशेषत: कोरोना काळानंतर त्यांनी पुनर्विचार सुरू केला आहे आणि भारतच त्यांना मार्ग दाखवेल यावर त्यांचे एकमत असल्याचे दिसते. भारताची ती परंपरा आहे. भारताने यापूर्वीही हे केले आहे. आपल्या समाजाचा आणि राष्ट्रांचा जन्म त्याच उद्देशाने झाला आहे.”

“…काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड मुस्लिम कौन्सिलचे सरचिटणीस भारतात आले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, जर आपल्याला जगात सुसंवाद हवा असेल तर भारताची त्यासाठी गरज आहे. त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच हिंदू समाजाचे अस्तित्व आहे…” असेही त्यांनी म्हटले आहे. (World Hindu Congress 2023)

मोहन भागवत यांच्याहस्ते आज वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२३ चे उद्गघाटन झाले. या परिषदेत विचारवंत, कार्यकर्ते आणि नेते यांना एकत्र आणून जगभरातील हिंदूंना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हाने यावर विचारमंथन केले जाणार आहे. तसेच त्यांचे निराकरण करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.

चार वर्षांतून एकदा होणाऱ्या वर्ल्ड हिंदू काँग्रेस (WHC) च्या तिसऱ्या आवृत्तीची थीम ‘जयस्य आयतनम धर्मः’ अशी आहे.

Back to top button