हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान : रामास्वामी | पुढारी

हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान : रामास्वामी

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मी हिंदू आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझ्या आस्थेनेच यावेळच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या मोहिमेपर्यंत पोहोचलो आहे. जगात एकच देव असून त्यानेच सर्वांनाचा कोणत्या कोणत्या हेतूने पृथ्वीतलावर पाठवले असल्याचे प्रतिपादन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी केले आहे. ते म्हणाले की, मी परंपरावादी घरात वाढलो आहे.

आपले कुटुंबच आपला पाया असल्याचे माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे. लग्न हे एक पवित्र बंधन आहे. सर्वजण देवासमोरच लग्नबंधनात अडकतो, त्यामुळे आपल्या जीवनात घटस्फोटाला कधीच स्थान असू नये. देवाप्रति आस्था ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आम्ही सर्व समान आहोत, कारण प्रत्येकामध्ये देव वास करत असतो. देवाबाबत असलेली माझी आस्थाच माझ्या जीवनाचा पाया आहे. रामास्वामी यांच्याशिवाय निक्की हेली आणि रॉन डिसेंटिस आयोवामध्ये आयोजित केलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी या तिघांनी एकमेकांची चौकशी करत आपली मते मांडली. सर्वांनी इस्रायल-हमास युद्ध, चीन आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबत परराष्ट्र धोरणावर मनमोकळी चर्चा केली.

Back to top button