हिजबुल्ला, हमास, इस्लामिक जिहादची बैठक | पुढारी

हिजबुल्ला, हमास, इस्लामिक जिहादची बैठक

बैरूत; वृत्तसंस्था : हिजबुल्ला ही लेबनॉनमधील दहशतवादी संघटना तसेच पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद (पीआयजे) आणि हमासची संयुक्त बैठक बैरूतमध्ये झाली. गाझा आणि वेस्ट बँकमधील इस्रायलच्या हल्ल्यांविरुद्ध संयुक्त रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली.

जेरूसलेम पोस्टमधील वृत्तानुसार, ही बैठक म्हणजे इराणच्या धोरणाचे फलित आहे. अल-मायादीन या इराणमधील माध्यम संस्थेच्या वृत्तानुसार, तिन्ही संघटनांमधील वाढता समन्वय हे इराणच्या पुढाकाराचा व प्रयत्नांचा परिणाम आहे.

Back to top button