

तैपेई, वृत्तसंस्था : सध्याच्या आधुनिक जगात सर्वत्र लग्नासोहळ्यापूर्वी प्री-वेडिंग शूट Pre-wedding shoot करण्याची क्रेझ जोडप्यामध्ये पाहायला मिळते. त्यासाठी निसर्गरम्य आणि मनमोहक ठिकाणांची निवड केली जाते, पण तैवानमध्ये एका जोडप्याने चक्क कचर्याच्या ढिगासमोर प्री-वेडिंग शूट करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अर्थात, यामागे त्यांचा हेतू अगदी स्वच्छ असून याद्वारे त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा संदेशच दिला आहे.
तैवानमधील नान्टो काऊंटमधील आयरिस सुएह आणि इयान सिलोऊ यांनी गळाभेट घेत प्री-वेडिंग शूट Pre-wedding shoot केले. दोघांच्या लग्नसोहळ्याला येणार्या पाहुण्यांनी अनावश्यक कचरा करू नये आणि त्याबाबत त्यांनी सतर्कता बाळगावी, अशी अपेक्षा या जोडप्याने व्यक्त केली आहे. पाहुण्यांनी लग्नसोहळ्याला येताना स्वतःबरोबर एक डबा आणावा जेणेकरून शिल्लक राहिलेले जेवण ते डब्यात भरतील आणि अन्न वाया जाणार नाही याची पाहुणे काळजी घेतील, असे या जोडप्याचे म्हणणे आहे.