ब्रेन चिप चाचणीसाठी ‘न्यूरालिंक’ला मंजुरी | पुढारी

ब्रेन चिप चाचणीसाठी ‘न्यूरालिंक’ला मंजुरी

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अ‍ॅलन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीला ब्रेन चिपच्या मानवी चाचणीसाठी इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. आता न्यूरालिंक कंपनीचा मार्ग मोकळा झालेला असून, कंपनी चाचणीसाठी लोकांची निवड करू शकेल.
मानवी चाचणी यशस्वी ठरली, तर अंध व्यक्तीही जग पाहू शकतील. पक्षाघात पीडित लोकही नुसता विचार करून संगणक चालवू शकतील, असा न्यूरालिंकचा दावा आहे.

सर्व्हायकल स्पायनल कॉर्डला दुखापतीमुळे एमियोट्रॉफिक लेटरल स्क्लॅरोसिसच्या कारणास्तव ज्यांना क्वाड्रिप्लॅझिया हा आजार आहे, ते लोक या चाचणीत सहभागी होऊ शकतात, असे न्यूरालिंकने म्हटले आहे. चाचणीत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांचे वय 22 वर असावे. चाचणीसाठी 6 वर्षे लागतील. यादरम्यान सहभागींना येण्या-जाण्यासह सर्वप्रकारचा खर्च कंपनीकडून देण्यात येईल.
याआधी कंपनीला मे महिन्यात अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाची मंजुरी चाचणीसाठी मिळाली होती.

Back to top button