वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठा वळू स्विस ब्राऊन प्रजातीचा असून, तो अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समध्ये आहे. दररोज 13 किलो धान्य, 34 किलो गवत असा त्याचा खुराक आहे. 150 लिटरहून जास्त पाणी तो दिवसभरात पितो. तो 13 वर्षांचा असून, त्याची उंची 1.87 मीटर (6 फुटांवर) भरली असून, गिनिज बुकात या विक्रमाची नोंद झालेली आहे.
फ्रेड आणि लॉरी यांच्या शेताची तो शान मानला जातो. टॉमी असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तो दिवसभराचा होता तेव्हापासून फ्रेड आणि लॉरीसोबत आहे. टॉमी सांड आडदांड दिसत असला तरी स्वभावाने एकदम शांत आहे, असे फ्रेड आणि लॉरी सांगतात.