रशियात विमान दुर्घटनेत १० जण ठार; पुतीन विरोधात बंड पुकारणारे प्रिगोझीन देखील विमानात | पुढारी

रशियात विमान दुर्घटनेत १० जण ठार; पुतीन विरोधात बंड पुकारणारे प्रिगोझीन देखील विमानात

पुढारी ऑनलाईन  डेस्क : वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांना घेऊन जाणारे विमान बुधवारी (दि. २३) कोसळल्याची घटना घडली. रशियामध्ये घडलेल्या या दुर्घटनेत १० जण ठार झाल्याची माहिती आहे. या विमानात प्रीगोझीन यांचा हे या विमानात होते असं सांगितले जात आहे. मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Plane Crash in Russia)

प्रीगोझिन यांनी दोन महिन्यांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात सशस्त्र बंड पुकारले होते. त्यानंतर एका करारानुसार त्यांना बेलारूसला हलवण्यात आले. आज (दि. २३) मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला एक खासगी विमान जात होते. हे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानात उपस्थित लोकांच्या यादीमध्ये प्रीगोझीन यांचे देखील नाव आहे. मात्र अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Plane Crash in Russia)

प्रीगोझिन यांच्यावर होता हल्ला, दरोडा आणि फसवणुकीचा गुन्हा

येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म 1 जून 1961 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. पुतीनप्रमाणेच येवगेनी सेंट पीटर्सबर्गमध्ये वाढले. रशियन न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, येवगेनी यांना 1981 मध्ये प्राणघातक हल्ला, दरोडा आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

हेही वाचा

Back to top button