Russia’s Luna-25 ब्रेकिंग: रशियाचे चांद्रयान ‘लूना-२५’ चंद्रावर कोसळले! | पुढारी

Russia's Luna-25 ब्रेकिंग: रशियाचे चांद्रयान 'लूना-२५' चंद्रावर कोसळले!

पुढारी ऑनलाईन: भारताच्या चांद्रयान पाठोपाठ चंद्रावर पाठवण्यात आलेले रशियाचे ‘लूना-२५’ यान आज (दि.२०) चंद्राजवळ अंतिम टप्प्यात असतानाच कोसळले. जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने स्पेस कॉर्पोरेशन रोस्कोसमॉसचा हवाला देत (Russia’s Luna-25) हे वृत्त दिले आहे. यासंदर्भातील ट्विट एएनआयने केले आहे.

‘चांद्रयान-3’ पाठोपाठ सुमारे महिनाभराने म्हणजे शुक्रवारी ११ ऑगस्टला रशियाकडून ‘लूना-२५’ हे चांद्रयान प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान रशियन अंतराळ संस्था ‘रॉसकॉसमॉस’ या यानाने टिपलेले चंद्राचे छायाचित्र आपल्या टेलिग्राम चॅनेलवर शेअर केले होते. या संदर्भात माहिती देताना एजन्सीने म्हटले होते की, सुमारे पाच दिवस हे यान चंद्राभोवती फिरत राहील. त्यानंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी आपला मार्ग बदलेल. मात्र आज मार्ग बदलतानाच ते चंद्रावर कोसळले. लुना-२५ ही रशियाची ४७ वर्षांतील पहिली चंद्र मोहीम होती. मात्र चंद्रावर हे यान कोसळ्याने रशियाची ही मोहिम (Russia’s Luna-25) अयशस्वी ठरली आहे.

स्पेस कॉर्पोरेशन रोस्कोसमॉसने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लूना-२५’ हे यान अप्रत्याशित कक्षेत गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्यामुळे त्याचे अस्तित्व संपुष्टात आले. मिशन कंट्रोलने सोमवारी २१ ऑगस्ट रोजी नियोजित लँडिंगपूर्वी शनिवारी सायंकाळी 11:10 वाजता यानाला प्री-लँडिंग कक्षामध्ये हलविण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर असामान्य परिस्थिती उद्भवल्याने रशियाचे ‘लूना-२५’ यान चंद्रावर कोसळले असेह एजन्सीने केलेल्या निवेदनात म्हटले आहे, यासंदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button