Brazil | एका मिनिटात विमान १७ हजार फूट खाली कोसळले, सर्व ६१ जणांचा मृत्यू (Video)

Brazil Plane Crash | विमान क्रॅश होतानाचे व्हिडिओ व्हायरल
Brazil Plane Crash
ब्राझीलच्या साओ पाउलो येथे क्रॅश झालेले विमान. (Image source X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या विमान अपघातात (Brazil Plane Crash) विमानातील सर्व ६१ लोकांचा मृत्यू झाली आहे. या अपघातातून विमानातील कोणीही वाचलेले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अपघातग्रस्त विमान लोकवस्तीजवळ कोसळताना दिसत आहे. हे विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाले आहे. यादरम्यान एका कार्यक्रमात उपस्थित असलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी या दुःखद घटनेविषयी बातमी दिली. त्यांना उपस्थितांना याबद्दल एक मिनिट मौन पाळण्यास सांगितले. अपघाताचे कारण कळू शकलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Brazil Plane Crash | विमानातील कोणीही वाचले नाही

६१ जणांना घेऊन जाणारे विमान शुक्रवारी ब्राझीलमधील लोकवस्तीजवळ क्रॅश झाले. यात विमानातील कोणीही वाचले नाही. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा म्हणाले, "मला ही वाईट बातमी सांगताना खूप दुःख होत आहे. या भीषण अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे."

विमान कंपनीने केली ६१ जणांच्या मृत्यूची पुष्टी

एका सोशल मीडिया पोस्टमधून साओ पाउलो राज्यातील एक प्रादेशिक एअरलाइन वोपास (Voepass) ने फ्लाइट २२८३ क्रॅश झाल्याची पुष्टी केली आहे. त्यात म्हटले आहे की विमानात ५७ प्रवासी आणि ४ इतर क्रू मेंबर्स होते. सर्वजण ब्राझीलचे होते. यातील कोणीही वाचलेले नाही.

विमान नेमके कुठे चालले होते?

या दुर्घटनाग्रस्त विमानाने पॅराग्वे आणि अर्जेंटिनाच्या दक्षिणेकडील सीमेजवळील ब्राझीलमधील शहर कॅस्कावेल येथून उड्डाण केले होते. ते ग्वारुलहोस येथील साओ पाउलोच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने चालले होते. या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे वोपस एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एका मिनिटात विमान १७ हजार फूट खाली कोसळले

फ्लाइट ट्रॅकिंग डेटा दर्शवितो की एटीआर ७२-५०० हे एक ट्विन इंजिन टर्बोप्रॉप विमान केवळ एका मिनिटात १७ हजार फूट फूट खाली कोसळले. पण हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Brazil Plane Crash
Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बचावले; तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news