खलिस्तान्यांकडून कॅनडात मंदिराची तोडफोड | पुढारी

खलिस्तान्यांकडून कॅनडात मंदिराची तोडफोड

ओटावा; वृत्तसंस्था : कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानवाद्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराची तोडफोड केली. मंदिराच्या मुख्य दरवाजावर दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याचे पोस्टरही चिकटविले. निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करून या अंगाने चौकशी व्हावी, अशी मागणी या पोस्टरमध्ये करण्यात आली आहे.

निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. 18 जून रोजी कॅनडातील गुरुद्वारात 2 जणांनी त्याची हत्या केली होती. भारत सरकारचा या हत्येत हात असल्याचा खलिस्तान्यांचा आरोप आहे. ‘शीख फॉर जस्टिस’च्या या पोस्टरमध्ये कॅनडातील भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांची छायाचित्रे आहेत. अधिकार्‍यांच्या घराचा पत्ता सांगणार्‍यांना 10 हजार अमेरिकन डॉलर्स दिले जातील, असे त्यात म्हटले आहे. पोस्टरवर कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा, अपूर्व श्रीवास्तव आणि मनीष यांची छायाचित्रे आहेत. कॅनडात खलिस्तानवाद्यांकडून मंदिराच्या तोडफोडीची ही तिसरी घटना आहे.

Back to top button