प्रेमासाठी तब्बल 2 हजार 484 कोटींच्या संपत्तीवर तिने सोडले पाणी

प्रेमासाठी तब्बल 2 हजार 484 कोटींच्या संपत्तीवर तिने सोडले पाणी

क्वालालम्पूर : प्रेमासाठी नायिका किंवा नायक असीम त्याग केल्याचे द़ृश्य चित्रपटात पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावतात. वास्तव जीवनातही अशा घटना घडतात. मलेशियातील अँजेलिना फ्रान्सिस ही महिला त्यापैकीच एक. तिने आपली प्रियकर जेडिदिया याच्याशी लग्न करण्यासाठी तब्बल 2 हजार 484 कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडले आहे. वास्तविक तिला ही संपत्ती वारसा हक्काने मिळणार होती. मात्र तिच्या घरच्या लोकांना हा विवाह मंजूर नव्हता.

मलेशियातील विख्यात उद्योगपती खू के पेंग आणि माजी मिस मलेशिया पॉलीन चाय यांची ती कन्या आहे. ब्रिटनमधील विश्वविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणादरम्यान ती जेडिदियाच्या प्रेमात पडली होती. नंतर तिने घरच्या मंडळींसमोर आपले प्रेम उघड केले असता 'खानदान की इज्जत' व मुलाकडील कुटुंबाची आर्थिक स्थिती हे दोन मुद्दे समोर आले. त्यामुळे अँजेलिनाला घरातून नकार मिळाला. मात्र तिने निव्वळ प्रेमासाठी संपत्तीवरील आपला हक्क सोडून दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news