Mushroom mystery : मशरुम खाल्ल्याने तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर

Mushroom mystery
Mushroom mystery

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियामध्ये जंगली मशरुम खाल्ल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर आहे. त्यांना 'मशरूम पॉयझनिंग' झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पण्ण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. (Mushroom mystery) पोलिसांनी कुटुंबातील ज्या महिलेने जेवण तयार केले होते तिच्याकडे चौकशी करता लक्षात आले की, जेवण केल्यानंतर कुटुंबातील लोक आजारी पडले पण तिला काहीच झााले नाही. पोलिसांनी तिला कोणतेही आरोप न लावता सोडून दिले परंतु ती संशयित असल्याचे पोलिसांनी सांगतिले आहे.

Mushroom mystery : महिलेवर संशय

माहितीनुसार ऑस्ट्रेलियामधील ४५ वर्षीय एरिन पॅटरसनने 29 जुलै रोजी तिचे माजी सासरे डॉन आणि गेल पॅटरसन आणि गेलची बहीण हीदर विल्किन्सन आणि तिचा नवरा इयान यांच्यासाठी लिओनगाथा येथील तिच्या घरी दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवण करताच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर आहे. तपासात निष्पण झाले आहे की, त्यांना मशरूम खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी कुटुंबातील ज्या महिलेने जेवण तयार केले होते तिच्याकडे चौकशी करता लक्षात आले की, जेवण केल्यानंतर कुटुंबातील लोक आजारी पडले पण तिला काहीच झााले नाही. पोलिसांनी तिला कोणतेही आरोप न लावता सोडून दिले परंतु ती संशयित असल्याचे पोलिसांनी सांगतिले आहे. डॉन, गेल आणि हेदर आता मरण पावले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांची लक्षणे डेथ कॅप मशरूम खाल्ल्याप्रमाणे होती.

कुटुंबातील महिलेने व्हिक्टोरिया राज्यातील लिओनगाथा शहरातील मीडियाला सांगितले की, तिला काय झाले हे माहित नाही. "मी काहीही केले नाही,"मी त्यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या जाण्याने मी उद्ध्वस्त झाले आहे. पण महिलेने कुटुंबातील कोणत्या लोकांना कोणते जेवण दिले गेले किंवा मशरूमचे मूळ या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. जेवण बनवणारी स्त्री तिच्या पतीपासून विभक्त झाली होती परंतु त्यांचे नाते सौहार्दपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. दुपारच्या जेवणाच्या वेळी तिची मुलेही घरीच होती पण त्यांनी तेच जेवण खाल्ले नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी शनिवारी (दि.५) महिलेच्या घराची झडती घेतली. तिच्या घरातून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डने वृत्त दिले आहे की या प्रकरणाशी संबंधित आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलीस फूड डिहायड्रेटरवर फॉरेन्सिक चाचण्या करत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news