Ecuador : इक्वेडोरमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

Ecuador : इक्वेडोरमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : इक्वेडोरचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सियो यांची बुधवारी (दि.९) संध्याकाळी राजधानी क्विटोमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण इक्वेडोरमध्ये खळबळ उडाली आहे. ५९ वर्षीय पत्रकार व्हिलाव्हिसेन्सियो हे २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आठ उमेदवारांपैकी एक होते. निवडणुकीला १० दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर क्विटो येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली.

इक्वेडोरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी नियंत्रणाबाहेर होत आहे. गेल्या महिन्यात इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी संघटित गुन्हेगारीशी संबंधित खूनांच्या मालिकेनंतर तीन प्रांतांमध्ये आणीबाणी घोषीत केली होती. व्हिलाव्हिसेन्सियो यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला होता. पत्रकार म्हणून त्यांनी हा मुद्दा मांडला होता. बुधवारी भ्रष्टाचारविरोधात त्यांनी क्विटो येथून रॅली काढली होती. यावेळी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अध्यक्ष लासो यांनी विलाव्हिसेन्सियो यांच्या हत्येची पुष्टी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button