Apple’s Shoes : ४१ लाखांना विकले जाणार अ‍ॅपलचे बूट; ३२ वर्षे जुन्या बुटांचा लिलाव | पुढारी

Apple's Shoes : ४१ लाखांना विकले जाणार अ‍ॅपलचे बूट; ३२ वर्षे जुन्या बुटांचा लिलाव

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅपलने जवळपास ३० वर्षे जुने बूट लिलावात काढले आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट Sotheby वर बुटांच्या जोडीची मूळ किंमत ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

१९९० च्या दशकात कंपनीने नॅशनल सेल्स कॉन्फरन्ससाठी हे शूज खास डिझाइन केले होते आणि ते कर्मचाऱ्यांना खास भेट म्हणून देण्यात आले होते. अ‍ॅपलने हे शूज बनवण्यासाठी ओमेगा स्पोर्ट्ससोबत भागीदारी केली. यामुळेच अ‍ॅपलच्या शूजची किंमत एवढी वाढली आहे.

खरेदीदार ऑनलाइन बोली लावणार

खरेदीदार इच्छित असल्यास या स्नीकर शूजसाठी ऑनलाइन बोली लावू शकतात. दुर्मिळतेमुळे फारच कमी खरेदीदार त्यांना त्यांच्या अ‍ॅपल संग्रहाचा भाग बनविण्यास सक्षम असतील.

 

Back to top button