पाकिस्तानात तिन्ही सख्ख्या हिंदू बहिणींना केले मुसलमान!

पाकिस्तानात तिन्ही सख्ख्या हिंदू बहिणींना केले मुसलमान!

कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानातील एका हिंदू व्यावसायिकाच्या तिन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. पुढे काय होणार, त्याची पित्याला खात्री होती. घडलेही तसेच ज्या मुस्लिम वयस्कराने या तिन्ही बहिणींचे अपहरण केले, त्यानेच या तिन्हींचे सक्तीने धर्मांतर करवून घेतले आणि एकाचवेळी तिन्हींशी निकाह केला.

रहीम यार खान जिल्ह्यातील सादिकाबाद येथील परमेश, रोशनी आणि चांदनी या 16 वर्षे व त्याखालील वयोगटातील 3 बहिणींचे अपहरण झाले. तिघींचे वडील लीलाराम पन्हावर हे एक व्यावसायिक आहेत. सादिकाबादहून 60 कि.मी. अंतरावरील डहरकी येथील पीर मियाँ जावेद अहमद कादरी याच्या घरी मुलींना कैद करण्यात आले होते. या अल्पवयीन मुलींच्या धर्मांतराचा एक व्हिडीओही जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला होता. पोलिस, सरकार, न्यायालये कुणीही या गुन्हेगारांवर काहीही कारवाई करत नाहीत, करूच इच्छित नाहीत, भारतानेच आता मला मदत करावी, असा टाहो या मुलींच्या पित्याने फोडला आहे, असे दारेवार इत्तेहाद संघटनेचे प्रमुख शिवा कच्छी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news