रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास लागते ‘हे’ व्यसन, वाचा नवीन संशोधन काय सांगते? | पुढारी

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास लागते 'हे' व्यसन, वाचा नवीन संशोधन काय सांगते?

हेलसिंकी, वृत्तसंस्था : रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास वाईट गोष्टींचे व्यसन लागत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. वाईट व्यसनामुळे मृत्यू होण्याचा धोका 9 टक्क्यांनी वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. फिनलंडमध्ये झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, दिवसा जागणार्‍यांच्या तुलनेत रात्री जागरण करणार्‍या लोकांमध्ये तंबाखू, दारूचे व्यसन लागत असून त्यांना अमली पदार्थांचेही व्यसन लागते. जे अत्यंत धोकादायक आहे.

रात्री उशिरा झोपणार्‍यांच्या शरीरात मेलाटॉनिन नावाचे हार्मोन स्रवते. हे हार्मोन झोप येण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. उशिरा झोपणार्‍या लोकांमध्ये हे हार्मोन उशिरा स्रवते, त्यामुळे झोप उशिरा लागते आणि सकाळी ते लवकर उठत नाहीत. समजा ते उशिरा झोपून लवकर उठल्यास ते ताजेतवाणे राहू शकत नाहीत. त्यांच्यात दुपारी अथवा सायंकाळपर्यंत ऊर्जा निर्माण होते. हे संशोधन क्रोनाबायोलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

यासाठी 1981 ते 2018 पर्यंतच्या सुमारे 24 हजार जुळ्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित वागणे आणि आजारांवर अभ्यास करण्यात आला. या लोकांना झोपेच्या चक्राविषयी प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये 10 टक्के जुळ्यांनी रात्री उशिरापर्यंत जागरण करत असल्याचे सांगितले तर 33 लोकांनी रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आवडत असल्याचे उत्तर दिले. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठत असल्याचे 29 टक्के लोकांनी सांगितले तर 27.7 टक्के जुळ्यांनी सकाळी लवकर उठणे आवडत असल्याचे सांगितले.

Back to top button