दिया मुटियारा सुकमावती या ‘इस्लाम’ सोडून ‘हिंदू’ धर्मात | पुढारी

दिया मुटियारा सुकमावती या ‘इस्लाम’ सोडून ‘हिंदू’ धर्मात

जकार्ता ; वृत्तसंस्था : जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या इंडोनेशिया या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुहार्तो सुकार्णो यांची कन्या तसेच माजी राष्ट्राध्यक्षा मेघावती सुकार्णोपुत्री यांची बहीण दिया मुटियारा सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सुकमावती सुकार्णोपुत्री नावानेही त्या ओळखल्या जातात.

दिया मुटियारा सुकमावती यांचा भव्य धर्मांतरण समारंभ बाली बेटावर 26 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. समारंभाचे संयोजक आर्य वेदकर्ण यांनी सांगितले की, बाली अगुंग सिंगराजा येथे ‘शुद्धिवधनी’ शीर्षकांतर्गत हा कार्यक्रम होईल. यात त्या हिंदू धर्मात प्रवेश करतील. समारंभाच्या दिवशीच दिया यांचा 70 वा वाढदिवसही आहे.

आजीकडून मिळाली प्रेरणा

दिया यांच्यावर त्यांच्या आजी स्वर्गीय इडा आयु न्योमन राय श्रीम्बेन (1881-1958) यांचा प्रभाव होता. दिया यांच्या आजीही धर्माने हिंदू होत्या. दिया यांनी हिंदू धर्मशास्त्राचे सखोल अध्ययन केले आहे. बाली बेटावरील हिंदू समारंभांमध्ये त्या वर्षानुवर्षे सहभागी होत आल्या आहेत. दिया यांचे वकील विटारियोनो रेजसोप्रोजो यांनीही या माहितीला दुजोरा दिला.

इंडोनेशिया एकेकाळी हिंदूंचा देश

इंडोनेशियाची लोकसंख्या आज 21 कोटींवर आहे. 97 टक्क्यांच्या जवळपास मुस्लिम आहेत. केवळ बाली बेटावर हिंदू शिल्लक आहेत. एकेकाळी या देशात हिंदूंचे प्रमाण 100 टक्के होते.

Back to top button