Ukraine dam | युक्रेनमधील धरण क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त, हजारो लोक सुरक्षितस्थळी, पाहा व्हिडिओ

Ukraine dam | युक्रेनमधील धरण क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त, हजारो लोक सुरक्षितस्थळी, पाहा व्हिडिओ
Published on
Updated on

कीव्ह : पुढारी ऑनलाईन; क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील नोवा काखोव्का हे सर्वात मोठे धरण उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून धरणाच्या खालच्या भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याला रशियाला जबाबदार धरले आहे. यामुळे ८० गावांना पुराचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डनिप्रो नदीला पूर आला असून खेरसन शहराला पुराचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. झेलेन्स्की यांनी ट्विटर आणि टेलिग्रामवर या धरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा बाहेर पडत आहे. (Ukraine dam)

काखोव्का धरण हे खेरसन प्रदेशासाठी महत्त्वाचे आहे. हे शेतीला आणि रहिवाशांना तसेच झापोरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पाला पाणी पुरवते. रशिया व्याप्त क्रिमियाला दक्षिणेकडे पाणी वाहून नेणारी ही एक महत्त्वाची वाहिनी आहे. काखोव्का धरण उद्ध्वस्त झाल्याने झापोरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हे युक्रेनमधील सर्वात मोठे धरण आहे. रशिया तसेच युक्रेन या हल्ल्याची जबाबदारी एकमेकांवर लोटत आहेत. धरणावरील हल्ल्यानंतर युद्धभूमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. उत्तर युक्रेनमधील धरणालगतच्या ८० गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झालेला असून, अधिक लगतची गावे खाली करण्यात येत आहेत.

सोव्हिएत युनियनच्या राजवटीत १९५६ मध्ये युक्रेनमधील हे धरण बांधण्यात आले होते. निपर नदीवर बांधलेले हे धरण ३० मीटर उंच असून ३.२ किमी परिसरात व्याप्त आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर आपत्कालीन बैठक बोलावली. काखोव्का धरणावर रशियाने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले. (Ukraine dam)

आमचे धरण, आम्हीच फोडू? : रशिया

दुसरीकडे धरण असलेले क्षेत्र आमच्या ताब्यात असताना आम्ही हल्ला करायला मुर्ख आहोत काय, असा सवाल उपस्थित करून युक्रेननेच हे धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला.

कीव्ह, निप्रोवर क्षेपणास्त्र हल्ले

राजधानी कीव्हवर (युक्रेन) रशियाने १७ क्षेपणास्त्र हल्ले चढविले. निप्रो शहरावरही क्षेपणास्त्र हल्ले केले. निप्रोत १३ जण जखमी झाले आहेत.

धरण अवाढव्य; जलविद्युत प्रकल्पही

धरण ३० मीटर रुंद आणि ३.२ कि.मी. (२ मैल) लांब आहे. अमेरिकेतील ग्रेट सॉल्ट लेकएवढे पाणी या धरणात असते. जलविद्युत प्रकल्पही त्यावर होता.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news