रशियन क्रूड तेलाची आयात 1.96 दशलक्ष बॅरल

रशियन क्रूड तेलाची आयात 1.96 दशलक्ष बॅरल
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रशियाहून आयात केल्या जाणार्‍या कच्च्या तेलाची आयात नव्या उच्चांकी स्तरावर गेली आहे. सरत्या मे महिन्यात सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेहून आयात करण्यात आलेल्या एकत्रित क्रूड तेलापेक्षा जास्त आयात रशियाहून करण्यात आली असल्याची माहिती वोरटेक्सा संस्थेने आपल्या ताज्या अहवालात दिली आहे.

मे महिन्यात प्रति दिवस 1.96 दशलक्ष बॅरल इतकी कच्च्या तेलाची आयात रशियाहून करण्यात आली. एप्रिल महिन्याच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्याने जास्त होती. देशाला लागणार्‍या क्रूड तेलापैकी 42 टक्के आयात रशियाहून केली जात आहे. एकाच देशातून इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली जाण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. सौदीहून केली जाणारी आयात 5 लाख 60 हजार टनांपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी 2021 पासूनचा हा सर्वात कमी आकडा आहे.

ओपेक देशांकडून केली जाणारी क्रूड तेलाची आयात देखील सर्वकालीन नीचांकी स्तरावर म्हणजे 39 टक्क्यांवर आली आहे. ओपेक संघटनेत प्रामुख्याने आखाती देश आणि आफ्रिकन तेल उत्पादक देशांचा समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी ओपेक देशांकडून भारत सुमारे 90 टक्के इतकी क्रूड तेलाची आयात करीत होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news