अमेरिकेत पार्टटाईम जॉब करणार्‍यांची संख्या वाढली | पुढारी

अमेरिकेत पार्टटाईम जॉब करणार्‍यांची संख्या वाढली

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : 33 वर्षांच्या सॅम पोपला जून 2022 मध्ये मोठा धक्का बसला ज्यावेळी त्याला टेक या मार्केटिंग कंपनीतील नोकरी गमावावी लागली. कंपनीचा निर्णय पोपला आश्वर्चकारक होता त्याचबरोबर निराशजनक होता. यापूर्वीही त्याला 2020 मध्ये एका कंपनीतून काही दिवसांसाठी नोकरीतून काढले होते. त्यानंतर पोपने अन्य पर्यायांचा विचार सुरू केला. कोरोना काळात पोपने काही पैशांची बचत केली होती. या पैशांतून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायामुळे पोपला समाधान मिळू लागले. या व्यवसायामुळे मी आत्मनिर्भर झाल्याचा आनंद मिळाला असल्याचे पोप म्हणाला. त्यानंतर अमेरिकेत पोप प्रमाणे अनेकांनी काम आणि कामाच्या तासांतून सुटका करून घेतली आणि त्यांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. आकडेवारीनसार, मे महिन्यात आर्थिक कारणांमुळे अमेरिकेत पार्टटाईम जॉब करणार्‍यांची संख्या 2.18 कोटींवर पोहोचली. ही संख्या गेल्या वर्षीच्या मे महिन्यापेक्षा 5 टक्के अधिक आणि गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात 15 टक्क्यांनी वाढली.

पारंपरिक नोकर्‍यांकडे पाठ

अमेरिकेतील काही कर्मचार्‍यांना आता पारंपरिक नोकर्‍या करायच्या नाहीत. कारण, कोरोना महामारीच्या काळात मुले आणि वृद्ध माता-पित्यांची देखरेख करण्यात वेळ वाया गेला. त्यामुळे त्यांना आता त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवायचा नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Back to top button