Brazil : 'या' गावातील सुंदर मुलींना लग्नासाठी मिळेनात मुले... | पुढारी

Brazil : 'या' गावातील सुंदर मुलींना लग्नासाठी मिळेनात मुले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : तसं पाहिलं तर सुंदर मुलींच्या मागे मुले नेहमीच धावतात. त्यांची वाट पाहतात. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी वाट्टेल ते करतात. तिने आपल्याला ‘हो’ म्हणावं म्हणून नवनव्या पद्धती शोधून काढतात. पण, तुम्ही असं ऐकलं आहे का, जिथं अनेक सुंदर मुली आतुरतेने मुलांची वाट पाहत आहेत. जगामध्ये असंही एक गाव (Brazil) आहे, जिथं सुंदर, मनमोहक आणि आकर्षक मुली एखादा तरी मुलगा भेटावा म्हणून तडफडत आहेत.

या गावात मुलींचं लग्न होणं खूप कठीण झालं आहे. सुंदर मुलींच्या नशिबात असं का होतंय, ह्याचं कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तर हे गाव आहे ब्राझील देशातल्या ‘नोईवा दो कोरडेएरो’. हे गाव पर्वतांमध्ये वसलेलं आहे.  हे गाव जितकं सुंदर आहे तितक्याच या गावातल्या मुलीदेखील सुंदर आहेत. अशी माहिती आहे की, या गावातील २० ते ३० वयोवर्षांच्या मुलींची लग्न होत नाहीत, त्यांना लग्नासाठी मुलं मिळत नाहीत.

ब्राझील

ब्राझीलच्या (Brazil) ‘नोईवा दो कोरडेएरो’ या गावाची अवस्था ही गावात पुरूष नसल्यामुळे झाली आहे. कारण, या गावातील पुरुष शहराच्या ठिकाणी काम करण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे मुलींची संख्या जास्त आहे. गावाला समृद्ध करण्याची जबाबदारी इथल्या महिलांच्या खांद्यावर आलेली आहे. या गावातील सुंदर मुली एखाद्या मुलाशी प्रेम आणि लग्न करण्याची स्वप्नं पाहतात. पण, त्यांना त्यांचं गाव सोडायचं नाही.

या गावातल्या मुलींची इच्छा आहे की, बाहेरच्या गावातील मुलांनी त्यांच्याशी लग्न करावं आणि त्याच गावात संसार थाटावा. त्यामुळेच या गावातील मुलींना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. या गावात खूप कमी पुरुष आहेत. ज्यात लग्न झालेली आणि वयाने छोटी असणारी मुले आहेत. स्त्रीयांची संख्या या गावात जास्त असल्यामुळे या गावावर महिलांचं वर्चस्व आहे.

ब्राझील

जर या गावातील महिलांनी दुसऱ्या गावातील मुलांकडे लग्नासाठी आपला मोर्चा वळवला नाही तर लग्नासाठी मुलांच्या आयुष्यभर वाटच बघावी लागणार आहे. कारण, एखाद्या मुलाने त्यांच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली तरी, त्याला गावात महिला वर्चस्वाला तोंड द्यावं लागेल. कारण, गावातील सर्व क्षेत्रात महिलांचं राज्य आहे. त्याच्या नियमानुसार पुरुषांना या गावात वावरावं लागतं.

Back to top button