PM Rishi Sunak : पीएम ऋषी सुनक यांच्या कार्यालयानजीक गेटला अज्ञात कारची धडक; चालकास अटक

पीएम ऋषी सुनक यांच्या कार्यालयानजीक गेटला अज्ञात कारची धडक
पीएम ऋषी सुनक यांच्या कार्यालयानजीक गेटला अज्ञात कारची धडक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या लंडनमधील डाऊनिंग स्ट्रीटच्या (Downing Street) समोरील गेटवर कार आदळल्याची घटना घडली. पोलिसांनी वाहन चालवल्याप्रकरणी चालकाला अटक केली आहे. लंडन पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. (PM Rishi Sunak)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "येथील स्थानिक वेळेनुसार अंदाजे संध्याकाळी ४.२० वाजताच्या सुमारास एक कार व्हाईट हॉलवरील डाउनिंग स्ट्रीटच्या गेटवर आदळली. सशस्त्र अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी, नुकसान आणि धोकादायक वाहन चालवल्याच्या संशयावरून घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली. (PM Rishi Sunak)

यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लंडनच्या प्रसिद्ध ट्रॅफलगर स्क्वेअर ते पार्लमेंट स्क्वेअर दरम्यान असलेल्या व्हाईट हॉलला वेढा घातला. डाउनिंग स्ट्रीटमधील अधिकाऱ्यांना आत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. घटनेच्या वेळी सुनक त्यांच्या कार्यालयात होते की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रांमध्ये एक पांढरी प्रवासी कार डाउनिंग स्ट्रीटच्या गेटवर धडकल्याचे दिसून येते.

या घटनेत कोणीतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पीएम सुनक यांच्या कार्यालयामार्फत या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news