दोन हजार कि.मी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची इराणने केली चाचणी | पुढारी

दोन हजार कि.मी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची इराणने केली चाचणी

तेहरान, वृत्तसंस्था : इराणने तब्बल 2000 कि.मी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या तळापर्यंत पोहोचण्यास सक्षम असल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिका आणि युरोपकडून वारंवार विरोध होऊनही इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करणे सुरूच ठेवल्याचे सांगितले आहे.

इराणचे संरक्षण मंत्री मोहम्मदरेझा अशतियानी म्हणाले, हा आमच्या शत्रूंना इशारा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करू आणि या प्रदेशात शांततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. खैबर नावाचे हे क्षेपणास्त्र 1500 किलोपर्यंतचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र पर्शियाच्या आखातात गस्त घालणार्‍या युद्धनौका आणि पाणबुड्यांवर तैनात करण्यात आले आहे. नौदलाचे म्हणणे आहे की, इराणचे सशस्त्र दल आखातातील शत्रू जहाजांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या टॉमहॉकपेक्षा जास्त मारा करण्यास सक्षम आहे.

Back to top button