Haj pilgrims : मक्केमध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू

Haj pilgrims : मक्केमध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आखाती देश सौदी अरेबियात उष्णतेची लाट पसरली आहे. उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ३२३ इजिप्शियन नागरीक आहेत. मक्केतील अल-मुआसम येथील रुग्णालयाच्या शवगृहातून ही आकडेवारी समोर आली आहे.

हवामानातील बदलामुळे तीर्थयात्रेवर परिणाम होत असल्याचे सौदी हवामान विभागाने म्हटले आहे. तेथील सरासरी तापमान ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे. सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीमध्ये तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. राजनयिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ६० जॉर्डन लोकांचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी अम्मानने अधिकृतपणे ४१ मृत्यूंची नोंद केली. एएफपीच्या अहवालानुसार, आतापर्यंत अनेक देशांनी नोंदवलेल्या एकूण मृत्यूंची संख्या ५७७ वर पोहोचली आहे. मक्कातील सर्वात मोठ्या शवगृहांपैकी एक असलेल्या अल-मुआसममध्ये एकूण ५५० मृतांची नोंद आहे. तर उष्माघाताने ग्रस्त २ हजारहून अधिक यात्रेकरूंवर उपचार सुरू असल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गतवर्षीही विविध देशांतील २४० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये  इंडोनेशियन नागरिकांची संख्या जास्त होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news