त्याने रचला नवा इतिहास..पाय नसूनही केले एव्हरेस्ट सर | पुढारी

त्याने रचला नवा इतिहास..पाय नसूनही केले एव्हरेस्ट सर

काठमांडू; वृत्तसंस्था :  तीव्र इच्छाशक्तीद्वारे तुम्हाला अशक्य गोष्टीही शक्य करून दाखविता येतात. अशीच एक घटना म्हणजे दिव्यांग असूनही एव्हरेस्ट सर करणार्‍या हरी बुद्धा मागर यांनी नवा इतिहास रचला आहे. या यशाने त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक दिव्यांगांना एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा दिली आहे.

हरी बुद्धा मागर हे ब्रिटिश सैन्यातील निवृत्त गोरखा सैनिक आहेत. या विजयानंतर मागर यांनी आपल्या एव्हरेस्टच्या चढाईमुळे समाजातील अपंग लोकांविषयीचा समज हिमालयन स्की ट्रेक कंपनीच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय हरी बुद्धा मागर यांनी कृत्रिम पायांनी 8848 मीटर एव्हरेस्ट शिखर सर केले. या कामगिरीने जग थक्क झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हरी बुद्धा मागर यांनी युद्धात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. अफगाणिस्तानात तैनात असताना त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले होते.

कोण आहेत हरी बुद्धा मागर?

हरी बुद्धा मागर यांचा जन्म नेपाळच्या पश्चिमेकडील एका खेडेगावात 1979 मध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण रोल्पा जिल्ह्यात झाले. शाळेत जाण्यासाठी तो दररोज सुमारे 45 मिनिटे अनवाणी चालत जात. कागद आणि पेन नसताना लाकडी पाटीवर खडूच्या दगडाने लिहायला शिकले. मागर यांचे वयाच्या 11 व्या वर्षी लग्न झाले होते.

Back to top button