

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वॉशिंग्टनमधील कर्ज मर्यादा वाटाघाटीमुळे ऑस्ट्रेलियाचा दौरा पुढे ढकलला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने सिडनीत होणार क्वाड देशांची शिखर परिषद रद्द केली आहे. याबाबतचे वृत्त Reuters वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिका कर्जाच्या खाईत अडकली आहे. अमेरिका कर्ज फेडण्यास डिफॉल्ट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जो बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा पुढे ढकलला आहे. (quad meeting 2023)
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी सांगितले की पुढील आठवड्यात सिडनी येथे होणारी क्वॉड शिखर परिषद अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशिवाय होणार नाही. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये कर्ज मर्यादा वाटाघाटीमुळे (United States debt ceiling) ऑस्ट्रेलियाचा दौरा पुढे ढकलला.
अल्बानीज यांनी पुढे म्हणाले की ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपान या देशांतील नेते या आठवड्याच्या शेवटी जपानमधील जी-७ शिखर परिषदेत भेटणार होते. पण बायडेन यांनी त्यांच्या आगामी आशिया दौऱ्याच्या दुसर्या टप्प्यावर सिडनीचा दौरा रद्द केला.
"क्वाड नेत्यांची बैठक पुढील आठवड्यात सिडनीमध्ये होणार नाही. आम्ही जपानमध्ये होणाऱ्या परिषदेत क्वाड नेत्यांमध्ये चर्चा करणार आहोत," असे अल्बानीज यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सिडनीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा नियोजित द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रमही पुढे ढकलला जाऊ शकतो, असेही अल्बानीज म्हणाले.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा पुढील आठवड्यात सिडनी दौऱ्यावर येतील की नाही यावर अल्बानीज यांनी भाष्य केलेले नाही. क्वाड ही भारतासह जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांची मिळून एक युती आहे. हिंद महासागर तसेच प्रशांत महासागराच्या समुद्री क्षेत्रावरील चीनचे वर्चस्व रोखण्याचा या युतीचा उद्देश आहे. क्वाड युतीवर चीनचा आक्षेप आहे.
हे ही वाचा :