Australian woman : घनदाट जंगलात हरवली…वाईन आणि लॉलीपॉपमुळे वाचली! | पुढारी

Australian woman : घनदाट जंगलात हरवली...वाईन आणि लॉलीपॉपमुळे वाचली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : घनदाट जंगलात फिरायला गेल्‍यानंतर हरवले तर…? याच कल्पनेने आपण घाबरुन जातो; पण ऑस्ट्रेलियातील एक महिला घनदाट जंगलात रस्‍ता चुकली. तिची कारही चिखलात अडकली; पण न घाबरता तिने धीराने पाच दिवस जंगलात वास्‍तव्‍य केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल तिने पाच दिवस काय खाल्ले तर तिने या पाच दिवसांत  कारमध्‍ये सणारी एक वाईनची बाटली आणि लॉलीपॉपवर तिने पाच दिवस धैर्याने संकटाचा मुकाबला केला. अखेर पाच दिवसांनी तिला शोधण्यात पोलिसांना यश आले. लिलियन आयपी असे तिचे नाव आहे. तिच्या पाच दिवसांच्‍या जीवघेण्‍या ‘जंगल सफारी’ची  चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.(Australian woman)

आजच्या काळात गुगल मॅप खूप उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने ज्या ठिकाणा बद्दल माहित नाही त्या ठिकाणी गुगल मॅपच्या आधारे  सहज भेट देऊ शकतात. मात्र, अनेकवेळा असे देखील घडते की नेटवर्क काम करत नाही आणि अशा परिस्थितीत लोक अज्ञातस्थळी भटकतात. नुकतेच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेसोबत असेच काहीसे घडले.

Australian woman

गाडीत फक्त  वाईनची बॉटल आणि लॉलीपॉप

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्‍या  रिपोर्टनुसार, ४८ वर्षीय  लिलियन आपली कार घेवून एकटीच घनदाट जंगलात फिरायला गेली. तिला व्हिक्टोरियातील हाय कंट्रीला जायचे होते. वाटेत खूप मोठं आणि घनदाट जंगल असल्यामुळे या मार्गावरील वर्दळ कमी असते. प्रवासात तिची वाट चुकली. रस्‍त्‍यावर तिला याेग्‍य मार्ग दाखविणारं भेटलं नाही. मात्र चुकीच्या मार्गावरून जात असल्याचे लक्षात येताच तिने कार मागे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान गाडी झाडाझुडपात चिखलात अडकली.

Australian woman : पाच दिवस घनदाट जंगलात 

रिपोर्ट्सनुसार, जंगलात हरवल्यापासून लिलियनच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हते. त्यामुळे ती कोणाशीही संपर्क साधू शकत नव्हती. आणि मदत मिळवू शत नव्हती. त्यामुळे ती तिथेच अडकली होती. लिलियन दारू पीत नाहीl पण तिने तिच्या कारमध्ये वाईनची बॉटल भेट देण्यासाठी  ठेवली होती आणि लॉलीपॉप  होते.दरम्यान, ती बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली, त्यानंतर तिचा शोध सुरू झाला. पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जंगलाचा प्रत्येक कोपरा शोधला; परंतु लिलियनचा काहीही पत्ता लागला नाही.  एअर विंग डोंगराळ भागात  काम करत असताना अचानक एक कार दिसली. त्यानंतर लिलियनला मदत मिळाली आणि तिची सुटका झाली. ती पाच दिवस जंगलात अडकली होती. चौकशीत तिने सांगितले की, पाच दिवस लॉलीपॉप खाऊन आणि वाईन एक बाटली पिऊन दिवस काढले.विशेष म्‍हणजे तिने यापूर्वी तिने कधीही दारूचे सेवन केले नव्हते.

हेही वाचा 

Back to top button