G7 Summit : महात्मा गांधीचे ‘आदर्श’ हवामान बदलाविरुद्धचा लढा जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग’; जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

G7 Summit
G7 Summit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 Summit साठी जपानला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. त्यांनी अर्थव्यवस्था आणि संस्कृती सहित विभिन्न क्षेत्रात भारत जपान मैत्री संबंधांवर चर्चा केली. याशिवाय हिरोशिमा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींचे आदर्श परिवर्तनाशी लढण्यासाठी उत्तम मार्ग आहेत, असे म्हटले आहे. जाणून घ्या सविस्तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G7 Summit साठी शुक्रवारी जपानला रवाना झाले. जपानला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी G7 च्या आयोजनासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले, G7 च्या अद्भुत कार्यक्रमासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. भारताला G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचाही आभारी आहे. मी दिलेले बोधीवृक्ष तुम्ही हिरोशिमामध्ये लावले आणि ते जसजसे वाढत जाईल तसतसे भारत-जपान संबंध अधिक घट्ट होतील. बुद्धाच्या विचारांना अमरत्व देणारा हा वृक्ष आहे.

यावेळी जपानचे पंतप्रधान किशिदा आणि मोदी यांच्यामध्ये भारत-जपान व्यापार संबंध, आर्थिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रातील सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. G7 Summit

G7 Summit: महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याची स्थापना आणि अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी जपान सरकारचे आभार मानले.

G7 Summit: हिरोशिमा हा शब्द ऐकून जग हादरते

मीडियाशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, आजही 'हिरोशिमा' हा शब्द ऐकून जग घाबरते. G7 शिखर परिषदेसाठी माझ्या जपान भेटीदरम्यान मला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी मिळाली. आज जग हवामान बदल आणि दहशतवादाने त्रस्त आहे. पूज्य बापूंचा आदर्श हाच हवामान बदलाविरुद्धचा लढा जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यांची जीवनशैली निसर्गाप्रती आदर, समन्वय आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.

पुढे जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, G7 Summit हिरोशिमा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यामुळे अहिंसेचा विचार पुढे जाईल. मी जपानच्या पंतप्रधानांना भेट दिलेला बोधी वृक्ष हिरोशिमा येथे लावला आहे हे जाणून घेणे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे जेणेकरून लोकांना येथे आल्यावर शांततेचे महत्त्व समजेल. मी महात्मा गांधींचा आदर करतो.

तसेच, जपानमधील हिरोशिमा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिरोशिमा येथे महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याची आणि अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो. आपण सर्वांनी महात्मा गांधींच्या आदर्शावर चालले पाहिजे आणि विश्व कल्याणाच्या मार्गावर चालले पाहिजे. हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल. G7 Summit

हिरोशिमाचे महापौर मात्सुई काझुमी, पंतप्रधान मोदी जपानच्या हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण करताना उपस्थित होते. ते म्हणाले, महात्मा गांधी हे अत्यंत आदरणीय व्यक्ती होते ज्यांनी आयुष्यभर अहिंसेला मूर्त रूप दिले. या शहरासाठी त्यांच्या प्रतिमेचे हे सादरीकरण अतिशय अर्थपूर्ण आहे कारण आमची इच्छा महात्मा गांधींच्या धोरणाशी तंतोतंत जुळते.

हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. तिथे उपस्थितांनी पंतप्रधानांचे शॉल घालून स्वागत केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news