Labour Day : १ मे रोजी कामगार दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास…| History of Labour Day | कामगार दिनाचा इतिहास | पुढारी

Labour Day : १ मे रोजी कामगार दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास...| History of Labour Day | कामगार दिनाचा इतिहास

प्रसाद माळी; पुढारी ऑनलाईन : (Labour day, कामगार दिन) एक मे हा दिवस आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून आपण सर्वजण हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा करतो. तसेच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ (Labour Day) म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. या दोन मोठ्या व महत्त्वाच्या घटनांमुळे १ मे हा दिन आपणा सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा आहे; पण हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून किंवा ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ (International Labour day 2023) म्हणून केव्हापासून व का साजरा केला जाऊ लागला. चला तर मग जाणून घेऊया कामगार दिन का साजरा केला जातो व याचा इतिहास काय आहे याविषयी. (meaning of labor day, majdur divas)

मध्ययुगीन कालखंडाच्‍या  उत्तरार्धात जगभरात राजेशाही, सामंतशाही आणि सरंजामी व्यवस्थेविरोधात बंड होऊ लागले. यानंतर आपण आधुनिक इतिहासाच्या कालखंडत प्रवेश केला. १७ व्या शतकापासून इंग्लंडसह युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. या औद्योगिक क्रांतीबरोबर हळूहळू उद्योग उभे राहू लागले. नवनवी कारखाने स्थापन झाले. पूर्वी शेतकरी, शेतमजूर, मजूर राबणाऱ्या कष्टकरी जनतेचा वर्ग होता त्या वर्गात कामगार अर्थात औद्योगिक कामगार या वर्गाची भर पडली. (Labour Day)

History of labor day, कामगार दिनाचा इतिहास

औद्योगिक क्रांतीसह आधुनिक युगात अग्रेसर होताना नव्या सामाजिक समस्या आणि प्रश्नांसुद्धा सामोरे जावे लागले. नव्या व्यवस्थेत पुन्हा श्रमिक वर्गाची धनाढ्य व मालक वर्गाकडून पिळवणूक सुरु झाली. कामगारांचे शोषण सुरु झाले. कामाचे निश्चित तास, मेहनतीचा योग्य मोबदला, कामगारांचे जीवनमान उंचावणे यासाठी कामगार संघटीत होऊन आपल्या न्याय हक्कांची मागणी करु लागले. याची पहिली ठिणगी ऑस्ट्रेलियात पडली. कागारांनी मोठे आंदोलन व संघर्ष निर्माण करुन १८५६ मध्ये ८ तासांच्या कामाची मागणी मान्य करुन घेतली. (World labour day, significance of labour day)

Interesting facts about labor day, कामगार दिनाबद्दलच्या महत्त्वाच्या नोंदी

पुढे अमेरिकेच्या शिकागोमध्ये ऑस्ट्रेलियाच्या घटनेशी प्रेरित होऊन १ मे १८८६ रोजी शिकागोतील रस्त्यांवर कामगार वर्ग उतरला आणि आंदोलन करु लागला. संप आणि मोर्चांनी आंदोलनांला धार आली होती. या आंदोलनाला गंभीर वळण लागले आणि आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यात ६ आंदोलकांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगार वर्ग अधिकच भडकला आणि पोलिसांवर बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ पोलिस आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाला. आता आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या घटनेला जबाबदार म्हणून ८ लोकांना फासावर लटकवण्यात आले. या रक्तरंजित आंदोलनानंतर कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. शिकोगोच्या या घटनेला हेमार्केट दंगल म्हणून सुद्धा उल्लेख करण्यात येतो.
पुढे इंटरनॅशल फेडरेशन ऑफ सोशालिस्ट ग्रुप्स आणि ट्रेड युनियन्स यांनी १९८९ मध्ये १ मे १८८६ च्या शिकागोतील आंदोलनात शहीद झालेल्या कामगाराच्या बलिदानाची आठवण ठेवत या हुतात्मांच्या स्मरणार्थ १ मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले.

तेव्हापासून संपूर्ण जगभरात १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. भारतात लेबर किसान पार्टी या कामगार संघटनेने सर्वप्रथम १ मे १९२३ रोजी कामगार दिन साजरा केला होता. (2023 labour holidays)

अधिक वाचा :

Back to top button