

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्लीच्या तिहार तुरुंगात Tihar Jail कैद्यांमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये एक गँगस्टर प्रिन्स तेवतिया याचा मृत्यू झाला. तसेच आणखी 5 कैदीही जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग क्रमांक तीनमध्ये हे गँगवॉर घडले. दोन गटांमध्ये गँगवॉर सुरू झाल्याची माहिती मिळताच तिहार तुरुंग प्रशासानाने तिथे धाव घेत. दोन्ही गटांना वेगवेगळे केले. यामध्ये जखमी झालेल्या कैद्यांवर दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल केले. तिथे सध्या कैद्यांवर उपचार सुरू आहे.
या गँगवॉरमध्ये एका गटाने गँगस्टर प्रिन्स तेवतिया यावर धारदार हत्याराने 5-7 वेळा सपासप वार केले. त्यामुळे प्रिन्स हा जबर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रिन्स तेवतिया हा तुरुंग क्रमांक 3 मधील वॉर्डमध्ये बंद होता. यामध्ये 380 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्सवर 15 गंभीर गुन्हे दाखल होते. शुक्रवारी सायंकाळी 5.35 ला कैद्यांमध्ये भांडणे सुरू झाली. या दरम्यान तेवतिया वर एकाने धारदार हत्याराने हल्ला केला. घटनेतील अन्य जखमी कैदी बॉबी, अत्तातुर रहमान आणि विनय हे देखील जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स तेवतिया यानेच भांडण सुरू केले होते. त्याने कैदी अत्तातुर रहमान याला तुरुंगात पळायला लावले. नंतर त्यावर हल्ला केला. त्यामुळे अत्तातुर याने प्रिन्सवर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहे.
प्रिन्स तेवतिया हा दक्षिण दिल्लीचा गुंड होता. त्याच्या टोळीचे दक्षिण दिल्लीतीलच भ्रष्ट गुन्हेगार रोहित चौधरीशी वैर होते. रोहितचा बदला घेण्यासाठी तेवतियाने गँगस्टर लॉरेन्स बिस्वनोईशी हातमिळवणी केली. 2019 मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तेवतियाला अटक केली होती. मात्र, या प्रकरणात तो तुरुंगातून बाहेर आला. मात्र २०२१ मध्ये त्याला पुन्हा गुन्हे शाखेने अटक केली.
दरम्यान, पोलिस गँगवॉर घडण्याची कारणे आणि कैद्यांकडे शस्त्र कोठून आले याचा तपास करत आहेत. तुरुंगात कैद्यांमध्ये आपआपसात भांडणे होणे किंवा गँगवॉर होणे हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत.
हे ही वाचा :