रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची प्रकृती चिंताजनक

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. कॅन्सरसह अनेक आजारांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पुतीन यांना स्पष्ट दिसणे कठीण बनले आहे. तीव्र डोकेदुखीसह त्यांची जीभही बधिर झाली आहे. डॉक्टरांनी सध्या पुतीन यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दुसर्‍या बाजूला, माध्यमे त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत.

मेट्रो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय पुतीन सातत्याने तीव्र डोकेदुखीची तक्रार करत आहेत. द़ृष्टीच्या तक्रारीनंतर पुतीन यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे. टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआरच्या हवाल्याने माध्यमांनी दावा केला आहे की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना नव्या उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळेच संपूर्ण रशियात त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत.

 

Back to top button