Taliban : महिलांबाबत तालिबानचा आणखी एक मोठा फतवा, ‘या’ ठिकाणी जाण्यास बंदी

Taliban
Taliban

पुढारी ऑनलाइन डेस्क : Taliban : महिलांच्या उच्च शिक्षणावर बंदी घातल्यानंतर तालिबानने महिलांविरोधात आणखी एक फतवा काढला आहे. या फतव्यानुसार महिलांना हेरात प्रांतातील बागा किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, असा फतवा त्यांनी काढला आहे.

Taliban : तसेच या फतव्यानुसार महिलांना या ठिकाणी सह कुटुंब देखील जाता येणार नाही. एएनआयने याबाबत ट्विटकरून माहिती दिली आहे. त्यात एएनआयने असोसिएटेड प्रेसच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की अशा ठिकाणी दोन्ही भिन्न लिंगांची सरमिसळ होते. त्यामुळे धार्मिक विद्वान आणि लोकांच्या तक्रारीनंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा ठिकाणी महिलांसाठी पडद्याची व्यवस्था नसते.

अधिकार्‍यांनी सांगितले की रेस्टॉरंटच्या बागेत असे निर्बंध लादण्यात आले आहेत कारण तेथे पुरुष आणि महिला एकत्र आहेत आणि महिला कथितपणे हिजाब घालत नाहीत. बाहेर खाण्यावर ही बंदी फक्त हेरातमध्ये लागू असेल जिथे पुरुषांसाठी ही सुविधा सुरू राहील.
दरम्यान, हेरातच्या वर्च्यु अफेयर्स संचालनालयातील उप अधिकारी बाज मोहम्मद नझीर यांनी सर्व रेस्टॉरंट्स कुटुंबे आणि महिलांसाठी बंद असल्याचा दावा करणाऱ्या मीडिया वृत्तांचे खंडन केले. त्यांनी अशा वृत्तांना अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

हेरात हे प्रांत अफगाणिस्तानचा पश्चिमोत्तर भाग आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानने महिलांवर लादलेल्या निर्बंधांच्या मालिकेतील हे नवीनतम आहे. याआधी सहावीच्या वरच्या वर्गात मुलींना प्रवेश देणे, विद्यापीठांमध्ये महिलांची नोंदणी करणे आणि युनायटेड नेशन्ससह विविध संस्थांमध्ये महिलांना नोकरी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तालिबानने महिलांना पार्क किंवा जिमसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यासही बंदी घातली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news