Skymet : देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज | पुढारी

Skymet : देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने आज (दि. १०) वर्तवला आहे.

एल निनो व्यतिरिक्त मान्सूनवर परिणाम करणारे इतर घटक देखील आहेत. त्यामुळे देशातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत अपुरा पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तवला आहे.

हेही वाचा  

Back to top button