American Soldiers Vacation | अमेरिकेचे ५ हजार सैनिक थायलंडमध्ये सुट्टीवर

पाच दिवस मुक्काम; ५० सेक्स वर्कर्स ताब्यात
American Soldiers Vacation |
American Soldiers Vacation | अमेरिकेचे ५ हजार सैनिक थायलंडमध्ये सुट्टीवर
Published on
Updated on

बँकॉक; वृत्तसंस्था : अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन बुधवारी सकाळी थायलंडमधील लाम चाबांग बंदरात दाखल झाली. या युद्धनौकेसोबत अमेरिकन नौदलाची आणखी दोन जहाजेही थायलंडमध्ये पोहोचली आहेत. सुमारे नऊ महिन्यांपासून समुद्रात तैनात असलेल्या या नौदल तुकडीतील जवळपास ५ हजार अमेरिकी सैनिकांना पाच दिवसांच्या विश्रांतीसाठी पटाया येथे नेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर थायलंडच्या प्रशासनाने सुरक्षेसोबतच शहरातील नाईटलाईफ आणि देहव्यवसायाशी संबंधित भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या सैनिकांना पटायातील काही विशिष्ट देहव्यवसायाशी संबंधित भागात जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सैनिकांच्या आगमनापूर्वी थाई पोलिसांनी सुमारे ५० सेक्स वर्कर्सना ताब्यात घेतले आहे. अमेरिकी सैनिकांच्या स्वागतासाठी पटायातील काही बार बाहेर फलक लावले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, शॉपिंग सेंटर आणि पर्यटनाशी संबंधित अन्य व्यवसायांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

‘सोई-६’मध्ये जाण्यास अमेरिकी सैनिकांना बंदी

पटायातील नाईटलाईफच्या अनेक ठिकाणी अमेरिकी सैनिकांना जाण्याची परवानगी असली, तरी सोई-६ या प्रसिद्ध परिसरात जाण्यावर थाई अधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. हा परिसर बार आणि प्रौढ मनोरंजनासाठी ओळखला जातो आणि येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. थाई पोलिसांनी अमेरिकी सैनिकांना देशातील कायद्यांचीही जाणीव करून दिली आहे. थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायद्याने प्रतिबंधित असल्याचे त्यांना सांगितले आहे. त्याचबरोबर अमली पदार्थ आणि गांजाची विक्री करणाऱ्या दुकानांपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.

नऊ महिन्यांच्या तैनातीनंतर सैनिकांना विश्रांती

यूएसएस अब्राहम लिंकन ही अणुऊर्जेवर चालणारे अमेरिकन विमानवाहू युद्धनौका आहे. हे जहाज नऊ महिन्यांहून अधिक काळ समुद्रात तैनात आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या काळात हे जहाज अमेरिकेच्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होते. दीर्घकाळ समुद्रात तैनात राहिल्यामुळे जहाजावरील सैनिकांवर शारीरिक आणि मानसिक ताणही निर्माण झाला होता. त्यामुळे थायलंडमधील पाच दिवसांचा मुक्काम त्यांच्या विश्रांतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात जहाजावर आवश्यक साहित्य आणि पुरवठा भरला जाणार असून देखभाल-दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news