UN Report : येत्या काळात भारताला करावा लागणार 'तीव्र पाणी टंचाई'चा सामना

पुढारी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात भारताबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात म्हणजे 2050 पर्यंत भारतासमोर जगातील सर्वात मोठे जलसंकट उभे राहणार असून भारतीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असे UN ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच भारतासोबत शेजारील पाकिस्तान आणि चीन या देशात देखील पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान अनेक नद्यांमधील पाणी प्रवाहाची स्थितीही कमकुवत होईल, असे यूएन रिपोर्टमध्ये (UN Report) सांगण्यात आले आहे.
UN ने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जगातील १.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. २०१६ मध्ये जगभरातील ९.३३ कोटी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागत होता. युनायटेड नेशन्स वॉटर कॉन्फरन्स २०२३ च्या पूर्वी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर रिपोर्ट २०२३’ (UN Report) जारी करण्यात आला आहे. यामध्ये येत्या काही वर्षांमध्ये अनेक देशांना पाणी संकटाचा कशाप्रकारे सामना करावा लागेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.
India Likely To Be Severely Affected By Water Scarcity By 2050: UN Report https://t.co/9txwnsWqHp pic.twitter.com/dyR5ZzrSBk
— NDTV News feed (@ndtvfeed) March 23, 2023
UN Report : २६ टक्के लोकांना अद्याप शुद्ध पाणी नाही
जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तर केवळ ४६ टक्के लोकांनाच पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येत आहे. UN च्या वतीने युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील दोन ते तीन अब्ज लोक वर्षातून किमान एक महिना पाणीटंचाईशी झगडतात. त्यामुळे येत्या काळात हे पाणी संकट आणखी वाढणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
अहवालात इतरही दावे
आशिया खंडातील सुमारे ८०% लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे.
भारतासह, ईशान्य चीन आणि पाकिस्तानवर हे जलसंकट सर्वाधिक आहे.
जलसंकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असा अंदाज या रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.
हिमनद्या वितळल्यामुळे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख हिमालयातील नद्यांचा प्रवाह कमी होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.