किशिदा युक्रेनमध्ये तर जिनपिंग रशिया दौर्‍यावर | पुढारी

किशिदा युक्रेनमध्ये तर जिनपिंग रशिया दौर्‍यावर

कीव, वृत्तसंस्था : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा मंगळवारी आकस्मिक युक्रेन दौर्‍यावर पोहोचले. जपानच्या ‘एनएचके’ या टी.व्ही. वाहिनीने याबाबतचे फुटेज प्रसारित केले. किशिदा यांच्यासोबत रेल्वे स्थानकावर युक्रेनचे अधिकारी होते.

उल्लेखनीय म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग रशियाच्या दौर्‍यावर असताना किशिदा युक्रेनमध्ये पोहोचले. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी निर्धाराने संघर्ष करीत असलेल्या जनतेच्या साहस आणि धैर्य याप्रती किशिदा प्रशंसा करणार आहेत. तसेच झेलेन्स्की यांना जी-7 परिषदेचे निमंत्रण देणार आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे उत्साहपूर्वक स्वागत केले. आपल्या सीमांच्या पार असलेली मैत्री अधिक द़ृढ करण्याची ही एक संधी असल्याचे या दोघांनी आज म्हटले. यावर्षी बिजिंगमध्ये होत असलेल्या शिखर संमेलनाचे निमंत्रण जिनपिंग यांनी पुतीन यांना दिले.

Back to top button