इम्रान खान यांनी अटक टाळण्‍यासाठी पुन्‍हा लावली कार्यकर्त्यांची ‘फिल्‍डींग’ | पुढारी

इम्रान खान यांनी अटक टाळण्‍यासाठी पुन्‍हा लावली कार्यकर्त्यांची 'फिल्‍डींग'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्‍यासाठी मंगळवारी ( दि. १४ ) पुन्‍हा एकदा इस्लामाबाद पोलिसांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी धडक दिली होती. मात्र या कारवाईला विरोध करण्‍यासाठी तेहरीक-ए-इन्साफचे( पीटीआय ) कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले. यावेवेळी समर्थक पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिस आणि पीटीआय समर्थकांमध्ये हाणामारीही झाली. इम्रान खान यांनी अटक टाळण्‍यासाठी कार्यकर्त्यांची पुन्‍हा एकदा ढाल म्‍हणून वापर केला आहे, असा आरोप शरीफ सरकार करत आहे. तर माजी क्रिकेटपटू असणार्‍या इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांची ‘फिल्‍डींग’ लावून अटक टाळण्‍याचा पुन्‍हा एकदा प्रयत्‍न करत केला आहे.

पोलिस आणि इम्रान खान समर्थकांमध्ये हाणामारी

इस्लामाबाद पोलिसांनी मंगळवारी ( दि. १४ ) इम्रान खान यांच्या जमान पार्क निवासस्थानाबाहेर जमलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा तोफ आणि अश्रूधुराच्‍या कांड्या फोडल्‍या. समर्थकांना पाण्याच्या फवार्‍याने पांगवत होते. यावेवेळी समर्थक पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिस आणि पीटीआय समर्थकांमध्ये हाणामारीही झाली, पोलिसांसह कार्यकर्तेही जखमी झाल्‍याचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. व्हिडिओंमध्ये पोलिस अश्रुधुराचे नळकांडी फोडताना आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहे. या धुमश्‍चक्रीनंतर इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्‍या अटकेसाठी पाकिस्‍तान सरकारवर पदेशातून दबाव आहे. माझ्‍या अटकेचा कट रण्‍यात आल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

मागील तीन दिवसांमध्‍ये काय घडलं ?

सोमवार, दि. १३ मार्च रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खानच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले, दुसर्‍या दिवशी इस्‍लामाबाद पोलिसांनी मोठा ताफा जमान पार्क परिसरातील खान यांच्‍या निवासस्‍थानी बाहेर धडक दिली. इम्रान खान यांच्‍या निवासस्‍थानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.इम्रान खान यांच्या समर्थकांनी लाहोरमधील जमान पार्कच्या घराबाहेर दगडफेक केली आणि दंगल पोलिसांशी झटापट केली.

“मी लाहोर हायकोर्टात 18 तारखेला कोर्टात जाईन असे हमीपत्र दिले आहे. पण ते स्वीकारले नाही… का घेतले नाही? कारण लंडन येथील कटाचा भाग आहे. माझ्यावर आणि माझ्या पक्षावर हल्ला करून त्यांना खाली खेचले जाईल, असे आश्वासन नवाझ शरीफ यांना देण्यात आले आहे, असा आरोपही खान बुधवारी यांनी एका व्हिडिओच्‍या माध्‍यमातून केला.

इम्रान खान यांच्‍या अटकेशी सरकारचा कोणताही संबंध नाही. पोलीस केवळ न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन करत आहेत, अशी माहिती पाकिस्‍तानचे माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली. या अटकेचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पोलीस फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहेत,” असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

Toshakhana Case : काय आहे प्रकरण?

२०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता. या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

Imran Khan Arrested: तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

सत्ताधारी आघाडीच्या साथीदारांकडून तक्रार

सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये इम्रान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ECP) तक्रार केली होती. तोशाखाना (देशातील गोदाम) कडून अनुदानित किंमतीवर खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा खुलासा न केल्यामुळे इम्रानला अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती.

Imran Khan Arrested: तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

 

 

Back to top button