China’s New PM: ‘ली’ छियांग बनले चीनचे नवे प्रधानमंत्री | पुढारी

China's New PM: 'ली' छियांग बनले चीनचे नवे प्रधानमंत्री

पुढारी ऑनलाइन न्यूज – चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग हे तिस-यांदा विराजमान झाल्यानंतर ली छियांग हे चीनचे प्रधानमंत्री China’s New PM बनले आहे. ली छियांग हे शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे आहे, असे म्हटले जाते.

ली छियांग हे यापूर्वी झेजियांगचे गवर्नर आणि शंघाई चे पार्टी प्रमुख राहिले आहे. प्रो बिजनेस राजनेता अशी ली यांची प्रतिमा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत त्यांना नवीन पंतप्रधान म्हणून नामांकित करण्यात आले. चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात ली छियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने 10 वर्षांपासून क्रमांक 2 च्या खुर्चीवर असलेले ली केकियांग यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.

हे ही वाचा :

कागल : हसन मुश्रीफ यांच्या निवासस्‍थानी ईडीचा छापा; कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांची नाकाबंदी

नगर : वृक्षांची ओळख क्यू आर कोडद्वारे !

Back to top button