नोकरकपात थांबेना! फेसबुक, इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी Meta कडून आणखी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ- रिपोर्ट | पुढारी

नोकरकपात थांबेना! फेसबुक, इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी Meta कडून आणखी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ- रिपोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटा (Meta) आता दुसऱ्या टप्प्यातील नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. मेटा या आठवड्याच्या सुरुवातीला हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकणार असल्याचे नवीन एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या (Bloomberg) रिपोर्टनुसार, या आठवड्यात मेटाचे हजारो कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावतील. या रिपोर्टमध्ये नोकरकपातीशी संबंधित लोकांचा हवाला देण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये असे सूचित केले आहे की मेटाने संचालक आणि उपाध्यक्षांना या नोकरकपातीत समावेश असलेल्या कर्मचार्‍यांच्या नावांची यादी करण्यास सांगितले आहे.

Meta ने गेल्या वर्षीच्या अखेरीस नोकरकपात (layoffs) केली होती. आता दुसऱ्या फेरीत हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याची तयारी मेटाने केली आहे. पहिल्या फेरीत मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. हे प्रमाण एकूण कर्मचार्‍यांच्या १३ टक्के होते.

मेटाला आर्थिक फटका

टार्गेटेड जाहिरातींच्या श्रेणीतील अधिक निर्बंधांमुळे मेटाच्या कमाईत घट झाली आहे. याचा परिणाम कंपनीच्या जाहिरातींच्या उत्पन्नावर झाला आहे. मेटाव्हर्स हा नवीन प्लॅटफॉर्मदेखील अद्याप महसूलापासून दूर आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी २०२३ हे वर्ष कंपनीसाठी ‘कार्यक्षमतेचे वर्ष’ (year of efficiency) म्हणून घोषित केले आहे. कंपनीने कर्मचार्‍यांच्या अलीकडील कामगिरीचा आढावादेखील घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमावणार असल्याची चिंता लागली आहे. पण मेटाने या नोकरकपातीबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.

हे ही वाचा :

Back to top button