ग्रीसमध्ये दोन रेल्‍वे गाड्यांची समोरासमोर धडक; २६ ठार, ८५ जखमी | पुढारी

ग्रीसमध्ये दोन रेल्‍वे गाड्यांची समोरासमोर धडक; २६ ठार, ८५ जखमी

पुढारी ऑनलाईन ग्रीसमध्ये दोन रेल्‍वेंची भीषण धडक झाल्‍याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात. २६ लोक ठार झाले आहेत. तर ८५ लोक जखमी झाले आहेत. अथेन्सहून उत्तरेकडील थेस्सालोनिकी शहराकडे जाणारी एक प्रवासी ट्रेन आणि थेस्सालोनिकीहून लॅरिसाला जाणाऱ्या मालवाहू रेल्‍वे यांच्यात ग्रीसमधील लॅरिसा शहराबाहेर हा अपघात झाला.

ग्रीसमध्ये काल (मंगळवार) रात्री उशिरा या दोन रेल्‍वेंमध्ये ही समोरासमोरची धडक झाली. यामध्ये २६ जण ठार तर ८५ जण जखमी झाले आहेत. दोन रेल्‍वेंमधील धडक इतकी जोरदार होती की, प्रवासी रेल्‍वेच्या पहिले चार डबे रूळावरून घसरले. धडक झाल्यानंतर आग लागलेल्या पहिल्या दोन बोग्‍या जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाल्या. यानंतर सुमारे २५० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या अपघातानंतर गाडीमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. लोक रडत ओरडत होते असे एका प्रवाशाने स्‍थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button