Venice : ‘कालव्यांच शहर’ असलेल्या ”व्हेनिस’मधील कालवे का पडत आहेत कोरडे?

Venice : ‘कालव्यांच शहर’ असलेल्या ”व्हेनिस’मधील कालवे का पडत आहेत कोरडे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीमधील 'पाण्यावर तरंगणारं शहर', 'कालव्यांचं शहर' म्हणून ओळख असलेले 'व्हेनिस' (Venice) शहर पर्यटकांसाठी नेहमी अग्रस्थानी राहीलं आहे. बहुतांश पर्यटकांचं एक स्वप्न असतं ते म्हणजे 'व्हेनिस' शहरातील मनमोहक दृश्य पाहणं, ते अनुभवणं. काहींनी हे स्वप्न पूर्ण केलेही असेल. कालव्यामुळे या शहरातील पर्यटन विकसीत झाले आहे. तेथील मनमोहक दृश्ये पर्यटकांना भूरळ घालत असतात. पण अलिकडे या शहरातील कालवे कोरडे होताना दिसत आहेत आणि हा चर्चेचा विषय ठरला आहे. जाणून घेऊया का चर्चा होतं आहेत? काय आहेत त्याची कारणे? वाचा सविस्तर बातमी.

Venice : ११८ तलावांनी एकमेकांना जोडलं गेलेलं 'व्हेनिस'

'पर्यटन' ही एक ओळख असलेलं शहर 'व्हेनिस' हे आता तेथील दुष्काळग्रस्त परिस्थितीने चर्चेत आलं आहे. पण तुम्हाला व्हेनिस शहराबद्दल माहित आहे का? ते कधी वसलं, काय आहेत वैशिष्ट्ये. चला तर मग समजून घेऊया 'व्हेनिस' शहराबदद्ल. कालव्यांच शहर, तरंगणारे शहर अशी ओळख असलेलं हे शहर ११८ तलावांनी एकमेकांना जोडलं गेलं आहे. ते इटली देशाच्या उत्तर भागात पूर्व किनाऱ्यावर वसलं आहे. व्हेनिस हे शहर पाचव्या शतकात वसलं असं म्हंटलं जातं.  सध्या या शहरात अंदाजे १५० कालवे आणि ३९० पूल आहेत. या शहराचा तुम्हाला प्रवास करायचा असेल तर एकतरं बोटीनं जावं लागतं किंवा एकतर चालत प्रवास करावा लागतो. व्हेनिस शहराचे दोन भागात विभाजन करणारा 'ग्रँड कॅनाल' हा तेथील सर्वात मोठा कालवा आहे. तेथिल व्यवहार, पर्यटन, दैनंदिन जीवन हे बहुतांश कालव्यांवर आधारित आहे.

इटलीमध्ये पाण्याचे संकट

इटलीमध्ये गेल्या उन्हाळ्यापासून नद्या आणि तलावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. इटालियन पर्यावरणवादी संघटना, लेगॅम्बिएन्टे (Legambiente) यांनी सोमवारी (दि. 20 फेब्रुवारी) सांगितले की, येत्या काही महिन्यात पाण्याचे संकट आणखी वाढू शकते. कारण इटलीला आधीच "पाणी पुरवठा भरपूर असायला हवा अशा स्थितीत अजून पाणी टंचाई जाणवतं आहे.

व्हेनिसचे प्रसिद्ध कालवे आता कोरडे का पडत आहेत

हवामान तज्ज्ञांच्या मते व्हेनिसवर उच्च-दाब प्रणालीचा परिणाम होत आहे. या उच्च-दाब प्रणालीमुळे भऱतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने परिणामी कालवे कोरडे झाले आहेत. हवामान तज्ज्ञांनी पुढे असेही म्हंटलं आहे की, इटलीमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. एपीच्या (AP report) अहवालानुसार, गेल्या काही दिवसांमध्ये व्हेनिसचे काही दुय्यम कालवे जवळजवळ कोरडे झाले आहेत. डॉक केलेल्या वॉटर टॅक्सी, गोंडोला आणि रुग्णवाहिका असलेल्या बोटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं होतांना दिसतं आहेत.

Venice : कमी भरतीचा कालावधी आणि पावसाचा अभाव

तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीला कमी भरतीचा दीर्घकाळचा कालावधी आणि पावसाचा अभाव ही कारणे कारणीभूत आहे. दिवसेंदिवस तलावामधील पाण्याची पातळी कमी होत आहे, वारंवार पुराचा सामाना करावा लागतं आहे. १९६६ मध्ये सर्वात मोठा पूर आला होता. त्यानंतरचा पूर पाहता २०१९ मध्ये मोठा पूर आला. त्यानंतर वारंवार या शहराला पुराला सामोरे जावे लागले. यात लाखो युरोंचे नुकसान झाले आहे.

कालवे मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी वापरले जातात. मात्र आता निर्जल कालव्यांमुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. एपी अहवालात म्हटले आहे की, अशा परिस्थितीमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या रुग्णवाहिका दूर बांधण्यास भाग पडले आहे. कधीकधी हाताने स्ट्रेचर घेऊन लांब पल्ल्यापर्यंत वाहावे लागत आहे. रुग्णवाहिका कालव्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पर्यटनावरही त्याचा परिणामही होत आहे.

Venice : संक्षिप्तमध्ये व्हेनिस

  • इटलीमधील प्रसिद्ध ठिकाण
  • क्षेत्रफळ ४१४.६ चौकिमी
  • लोकसंख्या – अंदाजे २६ लाख
  • चलन -युरो
  • भाषा-इटालियन
  • प्रमुख व्यवसाय -पर्यटन, व्यापार
Venice
Venice

Venice : गोंडोला व्हेनिसचे पारंपरिक वाहन

गोंडोला हे व्हेनिसचे पारंपरिक वाहन आहे. विशिष्ट आकाराच्या नौका लांब, चिंचोळ्या बांबूंच्या साहाय्याने या चालवल्या जातात. ही बोट चालवणाऱ्याला गोंडोलियर म्हणतात.  २५० ते २८० च्या आसपास लाकडांचा वापर करुन या गोंडोला तयार केल्या जातात. बोटीचा तळ हा सपाट असतो आणि त्याला फक्त काळाच रंग असतो. अलिकडे अद्ययावत बोटींमुळे या गोंडोलाचे प्रमाण खूप कमी झालेले दिसतं आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news